संजय दत्तला शरण येण्यास हवा आणखी अवधी

0
52

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात शिल्लक राहिलेला साडेतीन वर्षांचा कारावास भोगण्याकरिता शरण येण्यासाठी आणखी थोडा अवधी वाढवून द्यावा, अशी विनंती काल संजय दत्तने सर्वोच्च न्यायालयाला केली. त्याला कोर्टाच्या आदेशानुसार १८ रोजी शरण यायचे आहे.

आपली भूमिका असणार्‍या चित्रपटांचे शुटिंग शिल्लक राहिले असून ते झाले नाही तर चित्रपटात पैसे गुंतवलेल्या निर्मात्यांचे मोठे नुकसान होईल, असे संजय दत्तने म्हटले आहे. शरण येण्यासाठी संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च रोजी दिलेल्या निवाड्यावेळी चार आठवड्यांची मुदत दिली होती. याआधी १८ महिन्यांची शिक्षा त्याने भोगलेली आहे. दरम्यान, दुसर्‍या एका घटनेत, संजय दत्तने कोर्टासमोर शरण येण्याऐवजी थेट जेल अधिकार्‍याकडे शरण जाण्यासाठीची केलेली विनंती विशेष टाडा कोर्टाने काल फेटाळली. मात्र शरण येण्यासंबंधी काही प्रक्रिया असल्याचे सांगून कोर्टाने विनंती फेटाळली.