Home बातम्या संजय दत्तची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली

संजय दत्तची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली

0

१९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्त याची क्युरेटिव्ह याचिकाही काल सुप्रीम कोर्टाने फेटाळली. हा संजय दत्तचा अखेरचा कायदेशीर पर्याय होता.

संजय दत्तच्या याचिकेत दखल घेण्यासारखे काही नसल्याचे सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सांगितले. बॉम्बस्फोट मालिकेतील उर्वरित साडेतीन वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी संजय दत्त १६ मे रोजी कोर्टाला शणण आला होता. आतापर्यंत त्याने ६९ दिवस तुरुंगात काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने १० मे रोजी संजयची फेरआढावा याचिका फेटाळली होती. त्यानंतर क्युरेटिव्ह याचिका त्याचा शेवटचा पर्याय होता. बॉम्बस्फोट कटाचा भाग म्हणून भारतात आलेल्या शस्त्रांपैकी ९ एमएम पिस्तुल व एके ५६ बंदुक सापडल्यामुळे संजय दत्तला शिक्षा झाली आहे.