25 C
Panjim
Monday, January 18, 2021

श्रीलंका-न्यूझीलंड पहिली कसोटी आजपासून

न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून गॉल येथे सुरुवात होणार आहे. मालिका २-० अशी जिंकल्यास कसोटी क्रिकेटच्या इतिहासात त्यांचा संघ प्रथमच कसोटीत अव्वल होणार आहे. श्रीलंकेचा संघ तुलनेने कमकुवत असला तरी मायदेशात खेळण्याचा फायदा त्यांना नक्की मिळणार आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने या मालिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

श्रीलंकेचा संघ सध्या संक्रमणाच्या प्रक्रियेतून जात आहे. सलामीवीर व कर्णधार दिमुथ करुणारत्नेचा अपवाद वगळता संघातील एकाही खेळाडूची संघातील जागा निश्‍चित नाही. त्यामुळे मायदेशातील चिरपरिचित खेळपट्‌ट्यांवर प्रभावी कामगिरी करत संघातील जागा मजबूत करण्याचा संघातील इतरांचा प्रयत्न असेल. दीर्घ कालावधीनंतर दिनेश चंदीमलचे संघात पुनरागमन झाले आहे. कसोटी क्रिकेटसाठी पुरक शैली त्याच्याकडे आहे. दुखापतींमुळे सातत्याने संघाच्या आत-बाहेर जात असलेला अँजेलो मॅथ्यूज हा अजून एक अनुभवी खेळाडू संघात असल्याने या दुकलीला मधल्या फळीत जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल. खेळपट्टीचे फिरकी स्वरुप पाहता लंकेचा संघ चार स्पेशलिस्ट फिरकीपटूंसह उतरण्याची तयारी करत आहे. परंतु, नाणेफेकीचा कौल गमावल्यास कसोटीच्या पहिल्याच दिवशी केवळ एका स्पेशलिस्ट जलदगती गोलंदाजासह खेळणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे सर्व बाबी ओळखूनच त्यांना संघाच्या रचनेबाबत निर्णय घ्यावा लागेल.

दुसरीकडे न्यूझीलंड संघाची फलंदाजी मजबूत आहे. केन विल्यमसन, रॉस टेलर हे उपखंडातील खेळपट्‌ट्यांवर खेळण्यात हातखंडा असलेले खेळाडू त्यांच्या संघात आहे. भारतीय वंशाचा सलामीवीर जीत रावलच्या रुपात भक्कम तंत्र असलेला खेळाडू त्यांना लाभला आहे. त्यामुळे फलंदाजी विभागात त्यांना सध्यातरी चिंता करण्याचे कारण नाही. गोलंदाजांची निवड मात्र त्यांनी सावधरित्या करावी लागेल. मिचेल सेंटनर व ऐजाझ पटेलच्या रुपात दोन डावखुरे फिरकीपटू खेळवायचे की अननुभवी पटेलला बाहेर बसवून लेगस्पिनर टॉड ऍस्टलला संधी द्यायची, हा कठीण निर्णय त्यांना घ्यावा लागेल.

श्रीलंका संभाव्य ः दिमुथ करुणारत्ने, लाहिरु थिरिमाने, कुशल मेंडीस, दिनेश चंदीमल, अँजेलो मॅथ्यूज, कुशल परेरा, धनंजय डीसिल्वा, लसिथ एम्बुलदेनिया, अकिला धनंजया, लक्षन संदाकन व सुरंगा लकमल.
न्यूझीलंड संभाव्य ः जीत रावल, टॉम लेथम, केन विल्यमसन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग, मिचेल सेंटनर, ऐजाझ पटेल, विल सोमरविल, ट्रेंट बोल्ट व टिम साऊथी.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

शेतकर्‍यांसोबत केंद्राची नववी चर्चाही निष्फळ

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांत काल पुन्हा झालेली चर्चाही निष्फळ ठरली आहे काल ही एकूण...