भारतीय जनता पार्टीचे उत्तर गोवा मतदारसंघाचे उमेदवार श्रीपाद नाईक सोमवार दि. २४ रोजी सकाळी १० वा. पणजीत महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
त्यानंतर श्री. नाईक यांच्या मरड-म्हापसा येथील कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होईल. उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यावेळी उपस्थित असतील.

