शोपियानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

0
5

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध लष्करी कारवाई तीव्र केली आहे. याच पार्श्वभूमीवर शोपियानसह विविध भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून मोहीम राबवली जात आहे. मंगळवारी सकाळी एका कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी शोपियानच्या जामपाथरीमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.
ठार केलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. पहिला दहशतवादी शाहिद कुट्टे हा शोपियानमधील छोटीपोरा हिरपोरा येथील रहिवासी होता. तो 2023 मध्ये लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला होता. 18 मे 2024 रोजी शोपियानमधील हिरपोरा येथे भाजप सरपंचाच्या हत्येत त्याचा सहभाग होता. दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख अदनान शफी दार अशी झाली आहे. तो शोपियानमधील वंदुना मेल्होरा येथील रहिवासी होता. तो 2024 रोजी लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला होता. 18 ऑक्टोबर 2024 रोजी शोपियानमधील एका मजुराच्या हत्येत तो सहभागी होता.