28 C
Panjim
Wednesday, December 2, 2020

शीतपेये आरोग्यदायी असतात (?)

 • डॉ. स्वाती हे. अणवेकर
  (म्हापसा)

जाहिरातींमध्ये ही शीतपेये आपल्या आरोग्याला कशी चांगली असतात आणि ती प्यायल्यावर आपण कसे निरोगी, तंदुरुस्त होऊ शकतो ही भ्रामक कल्पना आपल्या व पर्यायाने नव्या पिढीच्या मनात रुजवण्यासाठी केलेली असते.

आपण दूरदर्शनवर बर्‍याच जाहिराती पाहत असतो. एका जाहिरातीमध्ये हिरो हेलिकॉप्टरमधून दोरीच्या साहाय्याने एका टेकडीवर उतरतो आणि तिथे हातात शीतपेयाची बाटली घेऊन उभ्या असलेल्या सुंदरीकडून तो ती बाटली घेतो आणि गटागट संपवतो.
या अशा जाहिरातींमध्ये – ही शीतपेये आपल्या आरोग्याला कशी चांगली असतात आणि ती प्यायल्यावर आपण कसे निरोगी, तंदुरुस्त होऊ शकतो ही भ्रामक कल्पना आपल्या व पर्यायाने नव्या पिढीच्या मनात रुजवण्यासाठी केलेली असते. आज आपण या विषयाची माहिती जाणून घेऊ.
शीतपेय १८८४ मध्ये व्यावसायिक पातळीवर सर्वप्रथम उपलब्ध झाले ते मॉक्सी या नावाने. त्याची निर्मिती अमेरिकेतील लिस्बूफॉल येथील एका मेडिकल स्टोअर मालकाने केली. त्यानंतर कोकाकोला, पेप्सीकोला यांचा जन्म झाला.

मागील एका शतकापासून शीतपेय व्यवसायात व आर्थिक उलाढालीत प्रचंड वाढ झाली आहे. प्रागतिक पातळीवर हा व्यवसाय ६० बिलियन अमेरिकी डॉलर्स इतका असून जगभरात दर वर्षी १ बिलियन लीटर शीतपेयांचे उत्पादन होते.
आधुनिक काळामधील शीतपेये हे त्यात असणार्‍या साखरेचे प्रमाण, फळांचे रस, फ्लेवरिंग एजंट, कार्बोनेशन पातळी, प्रमुख पाणी विरहित घटक आणि कार्यकारिता या घटकांवर बर्‍याच गटांमध्ये विभागले गेले आहेत.

१) सॉफ्ट ड्रिन्क्स ः-

 • पिण्यासाठी तयार ज्यामध्ये कृत्रिम इसेन्स व फ्लेवर असते.
 • डायल्यूट करून पिण्याची पेये.
 • पिण्यायोग्य पेय ज्यात फळांचा रस असतो.
  २) कार्बोनेटेड पेय ज्यामध्ये कार्बोनेटेड गॅस घातलेला असतो.
  ३) फंक्शनल पेय – यात फळांचे रस, जीवनसत्व व खनिजे घातलेली असतात.
 • स्पोर्टस् एनर्जी ड्रिंक्स
 • न्युट्राक्युटीकल्स आणि वेलनेस ड्रिन्क्स.
  ही जी पेये असतात ती वैद्यकीय उपयोगासाठी किंवा आरोग्य सुधारण्यासाठी बनवली जातात. जसे हृदयाचे आरोग्य सुधारणे, रोगप्रतिकारशक्ती व पचन सुधारणे, शरीराची ऊर्जा वाढवणे इत्यादी.
  ४) फ्रूट ज्युस किंवा फळांचे ताजे रस – हे १०० टक्के फळांच्या साली व पूर्ण फळे वापरून तयार करतात. यात साखर, कृत्रिम गोडवा आणणारे घटक, टिकाऊ पदार्थ, चव व रंग आणणारे कृत्रिम घटक घालत नाहीत. त्यात फळांचे तुकडे किंवा फळांचे गर मिसळतात व विटामिन-सी पण मिसळतात. हे फळांचे रस फायबर, खनिजं, जीवनसत्व व अँटी ऑक्सीडन्ट्‌सनी परिपूर्ण असतात.
  सर्वच फळांच्या रसामध्ये फ्रुक्टोज नामक साखर असते पण सुक्रोज, ग्लुकोज व सॉर्बिटॉल यांचे प्रमाण कमी-जास्त असू शकते.

५) स्क्वॅश किंवा कार्डिअल्स हे कॉन्सन्ट्रेटेड असतात जे पिण्याआधी सौम्य करून प्यावे लागतात.
या सर्व पेयांमधील घटक कोणते?
१) सॉफ्ट ड्रिन्क्स – यात पाणी, स्वीटनर, कार्बनडायऑक्साइड, ऍसिड्यूलन्ट्‌स, फ्लेवरिंग एजन्ट्‌स, रंग, रासायनिक टिकाऊ पदार्थ व फेस तयार करणारे घटक असतात. काही शीतपेयांमध्ये साखरेऐवजी साखरेचा पर्याय वापरला जातो.
अ) पाणी – यात वापरले जाणारे पाणी हे त्यामधील कठीणपणा कमी करण्यासाठी रिव्हर्स ऑस्मोसिससारखी प्रक्रिया केल्या जातात. पारंपरिक शीतपेयांमध्ये ९०% पाणी असते. आणि डाएट शीतपेयांमध्ये ९९% पाणी असते.

ब) साखर व स्वीटनर – शीतपेयामध्ये १% ते १२% साखर असते- जसे सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज. यातील ग्लुकोज हे सामान्यपणे सर्व शीतपेयांमध्ये वापरतात.
अन्य नैसर्गिक कर्बोदकीय गोड पदार्थ आहेत. साखर अति प्रमाणात खाल्ल्याने स्थौल्य, मधुमेह आणि अल्कोहोलचे सेवन न करणार्‍यांना होणारा फॅटी लिव्हरचा रोग होऊ शकतो.
आरोग्याबाबत दक्ष असणार्‍या व्यक्तींसाठी काही शीतपेयांमध्ये साखरेऐवजी पर्यायी स्वीटनर्स वापरतात आणि त्यावर ‘नो ऍडेड शुगर’ असे केवळ लेबल लावले जाते.

क) ऍसिडिटी रेग्युलेटर्स आणि कार्बनडायऑक्साइड –
बर्‍याच शीतपेयांमध्ये कार्बनडायऑक्साइड वायू त्याची ऍसिडिटी वाढवायला, चव तीक्ष्ण करायला व ते शीतपेय बरेच दिवस टिकवण्यासाठी घातला जातो. त्यामुळे हे पेय फिज्झी अर्थात गॅसयुक्त बनते.
ऍसिडिटी रेग्युलेटर्स हे त्या शीतपेयाची चव वाढवून त्याची गोडी नियंत्रित करतात.
ऍसिड्‌स हे शीतपेय टिकवून ठेवण्यास उपयुक्त असतात. यात सायट्रिक, मॅलिक, सक्सीनिक, फॉस्फोरिक ही ऍसिड्‌स वापरली जातात.

ड) चव व रंग आणणारे घटक –
रंग हे शीतपेयांना आकर्षक बनवतात. त्याचप्रमाणे ते बनत असताना किंवा साठवून ठेवताना त्यातील रासायनिक व भौतिक गुणधर्म पाहिले जातात. तसेच त्यांचा पीएच, त्यात असणारी जीवनसत्वे, त्याचे पॅकिंग आणि ते कोणत्या प्रकारे साठा करून ठेवले जातील या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो.
क्रमशः

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

खाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री

>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...

शाळा सुरू करताना…

विलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...

पीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड

शशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...

दुरपती

पौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...

कार्तिकातला दीपराग

मीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...

ALSO IN THIS SECTION

अमृत फळ ः आवळा

डॉ. मनाली म. पवारसांतइनेज, पणजी आवळे वर्षातून काही काळच उपलब्ध असतात. आवळ्याचे लाभ पुढे वर्षभर घेता यावेत, या...

निद्रा भाग – १

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकरश्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव रात्री झोप न येण्याचे अजून एक कारण म्हणजे मोबाईलसारख्या गोष्टींचा अति प्रमाणात...

लहान मुलांना वाफ देताना…

डॉ. विशाल सावंत (बालरोग सर्जन)डॉ. सुमंत प्रभुदेसाई (बालरोग तज्ज्ञ)- हेल्थ-वे हॉस्पिटल सर्दी, रक्तसंचय आणि श्वसन संसर्गाचा सामान्य उपाय म्हणून...

आज गरज शक्तिउपासनेची

योगसाधना - ४८२अंतरंग योग - ६७ डॉ. सीताकांत घाणेकर आज कोरोनामुळे प्रत्येकजण गोंधळलेला आहे. धीर...

काय आहे… कोरोनरी हार्ट डिसीज?

डॉ. बिपीनचंद्र भामरे(कार्डियो थोरॅसिक सर्जन) हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे ७० वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या...