शीखविरोधी दंगली प्रकरणी शिक्षा भोगणाऱ्यामाजी खासदार सज्जन कुमार यांचा तुरुंगातच मृत्यू

0
12

काँग्रेसचे माजी खासदार आणि 1984 मधील दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलीतील आरोपी सज्जन कुमार यांचा 80 व्या वर्षी तुरुंगवास भोगत असताना मृत्यू झाला. दंगलीच्या गुन्ह्यात ते तिहारमध्ये जन्मठेप भोगत होते.
तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सज्जन कुमार यांना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शुद्ध हरपलेल्या अवस्थेत पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात आणले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

2018 साली दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमार यांना दोषी मानले होते. 1984 मध्ये शीख विरोधी दंगलीत एका शीख कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याचा आरोप सज्जन कुमार यांच्यावर ठेवला गेला होता.
31 ऑक्टोबर 1984 साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती. यानंतर संपूर्ण दिल्लीत चार दिवस शीख विरोधात दंगल उसळली होती.

1 नोव्हेंबर 1984 मध्ये दिल्लीच्या सरस्वती विहार येथे जसवंत सिंग यांच्या कुटुंबाला जिवंत जाळणाऱ्या जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप सज्जन कुमार यांच्यावर सिद्ध झाला होता. त्यानंतर त्यांना 2025 साली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगवासात होते.