शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा

0
11

राष्ट्रपतिपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केली.

आत्ता महाराष्ट्रात चाललेले राजकारण पाहता मी पाठिंब्यासाठी विरोध करायला हवा होता; पण राष्ट्रपतिपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. आताही शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असे सांगतानाच मी कोत्या मनाचा नाही. आदिवासी समाजाचे अनेक नेते-कार्यकर्ते-पदाधिकार्‍यांचे फोन आल्यानंतर प्रेमाच्या आग्रहाखातर आम्ही मूर्मू यांना पाठिबा देण्याचा निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. ठाकरे म्हणाले, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना कुणाला पाठिंबा देणार, याविषयी सगळीकडेच चर्चा सुरू होत्या. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी खासदारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव असल्याच्या बातम्या येत होत्या; पण मी नम्रपणे सांगू इच्छितो की राष्ट्रपतिपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदारांनी माझ्यावर कोणताही दबाव आणला नाही. आदिवासी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अखेर आम्ही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.