शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; एका तरुणास अटक

0
5

छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल वास्को पोलिसांनी वाडे-वास्को येथील एका तरुणाला अटक केली. त्याच्यावर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम 151 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाडे-वास्को येथील रोनाल्डो डिसोझा नावाच्या तरुणाने सोशल मीडिया ग्रुपवर शिवरायांद्दल वादग्रस्त व आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा हिंदू संघटनांनी एकत्र येत वास्को पोलीस स्थानक गाठून सदर तरुणाला तातडीने अटक करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा त्याला अटक केली.