शिवमोग्गा विमानतळाचे पंतप्रधानांकडून उद्घाटन

0
15

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कर्नाटकातील शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला मोदींसोबत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पाही उपस्थित होते. सुमारे 450 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या विमानतळाच्या वरच्या भागाची रचना कमळाच्या फुलासारखी करण्यात आली आहे. शिवमोग्गा येथे 3,600 कोटी रुपये आणि बेळगावात 2,700 कोटी रुपयांच्या अन्य काही योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली.