सडा मुरगाव येथील मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या जागेतील मान्यता न घेता बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यास त्याऐवजी पर्यायी जागा सुचवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल प्रतिवादींना काल दिले. सडा येथील एमपीएच्या जागेतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कथितरित्या बेकायदेशीरपणे उभारल्याप्रकरणी मुरगाव बंदर प्राधिकरणाने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीला मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आणि मुरगावच्या रहिवाशांनी काल उच्च न्यायालयात उपस्थिती लावली. गोवा खंडपीठाने पुतळा हटवल्यास त्याऐवजी पर्यायी जागा सुचवण्याचे निर्देश प्रतिवादींना दिले. गोवा खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब केली आहे.

