कला व संस्कृती खात्यातर्फे दिल्या जाणार्या सन २०११-१२ व २०१२-१३ च्या ‘युवा सृजन’ पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे जाहीर झाली असून उभरती गायिका शिल्पा डुबळे-परब, संगीतकार सिद्धनाथ बुयांव, कवी परेश कामत, राजय पवार आदींचा त्यात समावेश आहे.
सन २०११-१२ चे विजेते असे आहेत ः शिल्पा डुबळे-परब (संगीत), सोनिया शिरसाट (संगीत), माथीयस कुरैया (तियात्र), मनोहर भिंगी (नकला), परेश कामत (कवी), प्रदीप नाईक (चित्रकला), दामोदर च्यारी (भजन), मारियानेला डायस (लोककला)
सन २०१२-१३ च्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – नेवील परेरा (संगीत), शरद मठकर (संगीत), सिद्धनाथ बुयांव (संगीत), सोनिया सबरवाल (चित्रकला), सुशांत खेडेकर (कला), राजय पवार (साहित्य), रोमाल्डिना फर्नांडिस (तियात्र), नीलेश महाले (नाटक).
२० हजार रु. रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होईल.

