शिरदोन येथे 3 वाहनांत अपघात; एक जागीच ठार

0
15

शिरदोन-आगशी येथे राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दोन कार आणि एका दुचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला, त्यात एकाचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही कारमधील प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. पणजीहून मडगावकडे वेगाने जाणाऱ्या एका कारने शिरदोन येथे दुभाजकाला धडक देऊन दुसऱ्या बाजूला जात त्या मार्गावरील कार आणि दुचाकीला धडक दिली. त्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. दोन कारपैकी एक कार टुरिस्ट टॅक्सी (क्र. जीए-01-एफ-4152) आणि दुसरी कार ही खासगी (क्र. जीए-06-एफ-7681) आहे. या अपघातातील जखमींना बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी बरीच वाहतूक कोंडी झाली होती. आगशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि वाहतूक अन्य मार्गाने वळवली.