झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्यावर काल त्यांच्या मूळ गावी नेमरा (रामगड) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी चितेला अग्नी दिला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे यावेळी उपस्थित होते. मंगळवारी सकाळी मोठ्या संख्येने लोकांनी त्यांच्या मोरहाबादी येथील निवासस्थानी अंतिम दर्शन घेतले आणि श्रद्धांजली वाहिली.

