शिक्षण खात्याचे संचालक अनिल पवार यांना दिलेली सेवावाढ पुढील महिन्यात संपत असून त्यामुळे त्यांच्या जागी आता खात्याचे उपसंचालक जी. पी. भट यांची संचालक म्हणून वर्णी लागण्याची शक्यता खात्यातील सूत्रांनी व्यक्त केली. सध्याचे शिक्षण संचालक अनिल पवार यांना एका वर्षाची सेवावाढ देण्यात आली होती. ती ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस संपत असून त्यामुळे त्यांच्या जागी जी. पी. भट यांची वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. जी. पी. भट हे अनिल पवार यांच्यानंतरचे खात्यातील ज्येष्ठ अधिकारी आहेत.