शिक्षकांच्या सिलेक्शन ग्रेडची  १ एप्रिलपासून अंमलबजावणी

0
113

शिक्षण खात्यात २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सर्व शिक्षकांना सरकारने ‘सिलेक्शन ग्रेड’ लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होईल अशी माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिली. सुमारे पाच हजार शिक्षकांना वरील निर्णयाचा लाभ होईल. गेल्या बर्‍याच काळापासून शिक्षक वरील श्रेणी लागू करण्याची मागणी करीत होते. सरकारने परवा बुधवारी या संबंधीचे परिपत्रक जारी केले. २०१४-१५च्या अर्थ संकल्पीय भाषणात मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली होती. त्यानुसारच सरकारने वरील निर्णय घेतला आहे, अशी माहिती यावेळी श्री. भट यांनी दिली.