Home बातम्या शिक्षकांच्या वेतन कपातीला माध्यमिक शिक्षकांचा विरोध

शिक्षकांच्या वेतन कपातीला माध्यमिक शिक्षकांचा विरोध

0

शिक्षकांच्या पगार कपातीला अखिल गोवा उच्च माध्यमिक शिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. शिक्षकांची संघटना असलेल्या हिस्टॅगेच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या प्रकरणी न्यायालयांत जाण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

सहावी वेतन श्रेणी निश्‍चित करताना गोव्यांतील शिक्षकांना अतिरिक्त पगार दिला याचे कारण पुढे करून याआधीच शिक्षणखात्याने थकबाकीची वसुली सुरू केली होती. आता राहिलेली थकबाकी शिक्षकांच्या भविष्यनिर्वाह निधीतून कापण्यात येणार असे परिपत्रक शिक्षकांना पाठविले आहे.