मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बंडखोर गटाने शिवसेना पक्षावरील आपला दावा सादर करत थेट निवडणूक आयोगाकडे मागणी केली. यानंतर निवडणूक आयोगानेही कार्यवाही सुरू करत दोन्ही गटांना शिवसेनेवरील दाव्याबाबत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. त्याविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका सादर केली आहे.
या याचिकेत ठाकरे गटाने शिंदे गटाच्या मागणीवरून निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या कार्यवाहीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग यावर कार्यवाही करू शकत नाही, असा युक्तिवाद याचिकेत केला आहे.