29 C
Panjim
Saturday, March 6, 2021

शाणी

  • प्राजक्ता प्र. गावकर
    (नगरगाव- वाळपई)

आबालवृद्धांना त्याच्याबद्दल विलक्षण आपुलकी आहे. कुणाच्याही घरी काही कार्य असेल तर त्याचे पान ठरलेले असते.
असा हा ‘शाणी’. ना नात्याचा, ना गोत्याचा पण त्याच्याबद्दल लोकांना खूप जिव्हाळा आहे.

तो आमच्या गावात कसा आला… ते नक्की माहीत नाही. पण तो आला तेव्हा माझी मुले खूपच लहान होती. मुलगा बालवाडीत जात होता तर मुलगी नुकतीच कुठे रांगत होती.
तो आमच्या घरासमोरील रस्त्यावरून ये- जा करायचा. त्याला पाहून माझा मुलगा रोहन थरथर कापायचा. कारण तो होताच तसा अजागळ. डोक्यावर केसांचे जंगल, दाढी-मिश्या वाढलेल्या, पान खाऊन रंगलेले तोंड, त्याचे ते खदाखदा हसणे आणि हसताना तांबडे झालेले दात दिसत. हातापायांची नखे वाढलेली, कपडेही फाटके-तुटके, अंगावरचे टिशर्ट एकदमच मळके , कंबरेला कधी टॉवेल तर कधी सुंभाने करकचून बांधलेली पँट, अंगाला १५-१५ दिवस पाण्याचा स्पर्श नाही, बोलणेपण त्याचे तसेच हातवारे करत. केव्हाही- कुठेही- कधीही जायचे… यायचे..! कुणाच्याही दारात थांबून जेवण मागायचे. कुणी जेवण दिले तर जेवायचे नाहीतर उपाशी राहायचे. त्याला दारूच्या दुकानाबाहेर घुटमळताना पाहून कुणी एखादा ‘बिचारा’ त्याला ग्लास- दोन ग्लास दारू पाजायचा व जे काय पुण्य मिळते ते पदरात पाडून घ्यायचा
कधी कधी तो आपणहून लोकांना ‘‘कायी काम आसा जाल्यार सांगा’’, असे म्हणायचा. मग कुणीतरी त्याला हाक मारी, ‘‘शाणी, ओ शाणी, हांगा यो रे’’.
हो हो, त्याचे नाव ‘शाणी’. हाक मारणार्‍याला हा विचारी, ‘‘किदेरे पात्रांव?’’ हाक मारणारा त्याला सांगे, ‘‘भाटांन वचून कवाथ्याक माती ओढ. सुपार्‍या पाडय, चुट्टां एकथाय कर’’ ‘‘आमगेल्यो म्हंशी राखूंग व्हर’’. त्या बदल्यात त्याला तो मागेल तसे शंभर- दोनशे रुपये किंवा जेवण- दारू द्यावी लागे. आणि जर का कुणी त्याला देतो असे म्हणून फसवले तर त्याची खैर नाही.

त्या लोकांना शिव्यांची लाखोली वाहायचा तो. येता- जाता त्यांच्या घराकडे डोळे वटारून हातवारे करत मोठ्यामोठ्याने बोलायचा. लहान मुलांबरोबरच मोठी माणसंही त्याला दबकून वागत.
असा हा ‘शाणी’. मोठी माणसं सांगतात की तो वाळपईजवळच्याच एका गावातला. त्याचेही कुटुंब होते. आई-वडील व हे तीन भाऊ. पण नियतीच्या क्रूर खेळीमुळे त्याच्या कुटुंबाची वाताहत झाली व तो निराधार होऊन त्याच्या डोक्यावर फार वाईट परिणाम झाला. तसा तो चांगला पदवीधर आहे. पण नियतीपुढे कुणाचे काहीच चालत नाही, हेच खरे.

चांगला सुशिक्षित असा हा ‘शाणी’ वेडा कसा झाला? तो इंग्रजी, मराठी, कोकणी, हिंदी या भाषा उत्तम बोलतो. तो छान रांगोळ्या काढतो, देवाचे अभंग म्हणतो, चांगली चांगली गाणी म्हणतो.
तो समोरच्या व्यक्तीशी चांगला बोलतो पण केव्हा त्याचे डोके फिरेल आणि त्याच व्यक्तीला तो शिवीगाळ करेल याचा नेम नाही.
मीपण त्याला फार भ्यायची. पण नंतर नंतर तो उगीचच कुणाची कळ काढत नाही असं मला समजल्यावर माझी भीती पण कमी झाली.
पाण्यात अथवा मातीत खेळणार्‍या लहान मुलांना वेळोवेळी सांगूनही ती ऐकत नाहीत तेव्हा ‘‘तो बघ हां ‘शाणी’ आला. थांब तुझे नाव सांगते आता त्याला’’, असे म्हटल्याबरोबर ते लहान मूल दोन्ही हातांनी पँट धरून धूम पळत घरात जाई. ते परत जायचे नाव काढत नसे. लहान मुलांमध्ये इतकी दहशत होती त्याची.
कधी कधी तो बोलण्याच्या ओघात समोरच्या व्यक्तीला सांगायचा, ‘‘माझे पण लग्न झालेय. बायको- मुले आहेत तिकडे…गावाकडे. परंतु मोठी माणसं सांगतात की हे काही खरे नाही.
आता त्याला आमच्या गावात येऊन फार वर्षे झालीत. तो सर्वांना विचारतो, ओळखतो. नावाने हाक मारून घरातल्यांची विचारपूस करतो. गावात एके ठिकाणी कधी तो बसलाच नाही. सर्वत्र तो फिरत असतो. सर्वांनाच त्याची आता सवय झाली आहे. तो चार दिवस कुठे दिसला नाही तर सर्वजण म्हणतात, ‘‘हे शाणी, खंय गेलो रे बाबा? चार दिस नाच जाग्यार’’. असा हा शाणी. वेडसर असूनही दिसावा असे वाटणारा.
कुणीतरी टाकलेले कपडे घालून, खूप कामाचा माणूस जसा तरातरा चालतो तसा तो चालतो. पण स्वभावाने मात्र गरीब बिचारा. त्याला थंडी, वारा, पाऊस काहीच बाधत नाही. थंडी-वार्‍यात हा भल्या पहाटे उघड्या अंगाने रस्त्यावरून फिरत असतो. भर पावसात तो ओल्या कपड्यात तसाच भिजत फिरतो. कधी कधी तो टक लावून आकाशात पाहत स्वतःशीच बडबडत बसतो.
आबालवृद्धांना त्याच्याबद्दल विलक्षण आपुलकी आहे. कुणाच्याही घरी काही कार्य असेल तर त्याचे पान ठरलेले असते. जेवण उरकल्यावर घरातली मोठी माणसं सांगतात, ‘‘दारातून शाणी जाताना दिसला तर हे जेवणाचे पान त्याला दे.’’
असा हा ‘शाणी’. ना नात्याचा, ना गोत्याचा पण त्याच्याबद्दल लोकांना खूप जिव्हाळा आहे

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

आमोण्याची ज्ञानगंगा ः रामदास विद्यालय

डॉ. विठ्ठल ठाकूर त्या काळात पोर्तुगीज सरकारचे सर्व नियम सांभाळले जात असत. वर्षात सर्व परीक्षा योग्य ते परीक्षक...

शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य

चेतन कवळेकर(राज्यपुरस्कारप्राप्त शारीरिक शिक्षण शिक्षक) शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फक्त तंदुरुस्त शरीर एवढेच नव्हे, तर त्यात शारीरिक आणि भावनिक...

एक अगम्य चाहता… कधीच न भेटलेला!

ज. अ. रेडकर. मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती...

गूढ वाढले

जगातील आठव्या क्रमांकावरील आणि आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ ह्या सत्तावीस मजली आलिशान निवासस्थानापासून पाच - सहाशे मीटरवर...

सहा पालिकांसाठी ३२३ अर्ज वैध

>> पणजी मनपासाठी १०६ उमेदवार रिंगणात, आज स्पष्ट होणार अंतिम चित्र येत्या २० मार्च २०२१ रोजी राज्यात होणार्‍या पणजी...

ALSO IN THIS SECTION

आमोण्याची ज्ञानगंगा ः रामदास विद्यालय

डॉ. विठ्ठल ठाकूर त्या काळात पोर्तुगीज सरकारचे सर्व नियम सांभाळले जात असत. वर्षात सर्व परीक्षा योग्य ते परीक्षक...

शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य

चेतन कवळेकर(राज्यपुरस्कारप्राप्त शारीरिक शिक्षण शिक्षक) शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फक्त तंदुरुस्त शरीर एवढेच नव्हे, तर त्यात शारीरिक आणि भावनिक...

एक अगम्य चाहता… कधीच न भेटलेला!

ज. अ. रेडकर. मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती...

विज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे

श्रेया काळे(पर्वरी) समस्या आहेत, आव्हानेही अनेक आहेत, पुढेही असतील पण विज्ञानाच्या आधारावर त्यावर मात करून आपले राष्ट्रवैभव टिकवू...

‘‘एक धागा सुखाचा…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) संपतराव आणि शारदाबाई यांना कर्ते-सवरते दोन पुत्र असताना आयुष्याच्या संध्यासमयी दुर्दैवाचे असे कठोर आघात सहन...