शांततापूर्ण आंदोलन करणे हा एक घटनात्मक अधिकार आहे, जो हिरावून घेतला जाऊ शकत नाही. केवळ आंदोलन आहे म्हणून पोलिसांची क्रूरता किंवा अतिरिक्त बळाचा वापर समर्थनीय ठरू शकत नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले.
20 जुलै रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या पोलीस लाठीमाराशी संबंधित याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने काल हे मत नोंदवले. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
न्यायालय आता मंगळवारी या सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी घेणार आहे.

