पाकिस्तानमधील अलीकडेच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नवाज शरीफ यांना मिळालेल्या विजयाचे भाजप कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्ष राजनात सिंग यांनी स्वागत केले आहे. नवाज शरीफ यांच्या पक्षाला सत्ता मिळाल्याने दक्षिण आशियात शांतता प्रस्थापनेला बळकटी मिळणार असल्याचे मत राजनाथ सिंग यांनी बैठकीवेळी व्यक्त केले.
याचबरोबर या घटनेकडे सावध आशावादाच्या नजरेतून पाहत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारत–पाकिस्तान यांच्यातील संबंध अनेक वर्षांपासून दोलायमान स्वरूपाचे राहिले असल्याने केवळ शब्दांचे बुडबुडे काढल्याने काही होणार नाही, ठोक कृती करावी लागेल असे ते म्हणाले. गृहमंत्र्यांनी निवेदन केले आहे की शीख युवकांना दहशतवादी कारवाया करण्यास पाकिस्तानच्या आयएसआयतर्फे उद्युक्त केले जात आहे.