शरद पवारांना केंद्रात मंत्रिपद?

0
46

शरद पवारांना भाजपने केंद्रात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याच ऑफरवर चर्चा करण्यासाठी त्यांचे अजित पवारांसोबत बैठकांचे सत्र सुरू आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

भाजपने शरद पवार यांना केंद्रात कृषीमंत्रिपदासह नीती आयोगाचे अध्यक्षपद आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल, अशी अट नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांपुढे ठेवली आहे. यामुळेच ते सातत्याने शरद पवारांची भेट घेत आहेत, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केला.

शरद पवार यांनी बुधवारी अजित पवारांसोबतच्या आपल्या वादग्रस्त भेटीवर भाष्य केले. त्यात त्यांनी अजित पवारांसोबतची आपली भेट गुप्त नव्हती. तसेच ते मला काय ऑफर देणार, मीच त्यांच्या पक्षाचा संस्थापक आहे, अशी कोपरखळीही त्यांना मारली.