व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान

0
120

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा व शेवटचा कसोटी सामना आजपासून वॉंडरर्स मैदानावर खेळविला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावल्यामुळे टीम इंडियाला ‘व्हाईटवॉश’ टाळण्यासाठी या कसोटीत उतरावे लागणार आहे. भारताने या मैदानावर अजून एकही पराभव पत्करलेला नसून दक्षिण आफ्रिकेतील सर्वांत वेगवान खेळपट्टी म्हणून या मैदानाकडे पाहण्यात येते.

खेळपट्टीवरील हिरवळ पाहता दक्षिण आफ्रिकेचा संघ केशव महाराज या फिरकीपटूला बाहेर बसवून थ्युनिस डी ब्रुईनच्या रुपात फलंदाज किंवा आंदिले फेलुकवायोच्या रुपात अष्टपैलू खेळवू शकतो. दुसरीकडे टीम इंडियासमोर संघ निवडीचा पेच आहे. चेतेश्‍वर पुजारा, लोकेश राहुल, रोहित शर्मा यांची खराब फॉर्ममुळे, पार्थिवची टुकार यष्टिरक्षणामुळे व अश्‍विनची खेळपट्टीच्या स्वरुपामुळे संघातील जागा धोक्यात आली आहे. ‘बदल’करण्यात हातखंडा असलेला कर्णधार विराट कोहलीने पार्थिवला वगळण्याचे संकेत दिले असून इतरांबाबत सामन्याच्या दिवशी निर्णय घेतला जाईल.

भारत (संभाव्य) ः मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, भुवनेश्‍वर कुमार, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह व मोहम्मद शामी.
द. आफ्रिका (संभाव्य) ः डीन एल्गार, ऐडन मारक्रम, हाशिम आमला, एबी डीव्हिलियर्स, फाफ ड्युप्लेसिस, क्विंटन डी कॉक, थ्युनिस डी ब्रुईन, व्हर्नोन फिलेंडर, कगिसो रबाडा, मॉर्ने मॉर्कल व लुंगी एनगिडी.