श्याम भंडारी (कळंगुट), विपीन एम. व्ही. वेणू गोपालन, कळंगुट मूळ केरळ, (२८), चिरंजीत सिंग नादेव (२२), कळंगुट मूळ उत्तर प्रदेश, जुबी थॉमस (२२), गौरावाडा- कळंगुट मूळ केरळ या संशयितांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. वरील संशयित बेकायदेशीररित्या स्पा चालवत होते. यासर्वांनी मिळून त्या दोघी मुलींना संजय राऊत (रायगड महाराष्ट्र), कृष्णा आकुले नारायण (हैद्राबाद) यांच्याकडे दिले होते.
कळंगुटचे पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांनी आपल्या सहकार्यासमवेत छापा घालून सहा जणांना अटक केली व दोघा मुलींची सुटका केली.
संशयित आरोपी पर्यटकांना वेश्या व्यवसायासाठी मुलींना देत होते व त्यांच्याकडून त्यामागे ५ ते १० हजार रुपये घेत होते अशी माहिती कळंगुट पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक नालास्को रापोझा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरीफ जॅकीस, विनय श्रीवास्तव, विनोद नाईक तसेच शीतल किनळकर यांनी हा छापा घालून संशयित आरोपीना अटक केली हे संशयित आरोपी अन्य काही गुन्ह्यात गुंतले आहेत काय याचीही चौकशी कळंगुट पोलीस करीत आहेत.