वेळ्ळीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे लढणार फिलीप नेरी रॉड्रिगीस

0
8

>> आमदारकीसह भाजप सदस्यत्वाचा राजीनामा

वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिगीस यांनी आमदारकीचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत, काल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने फिलीप नेरी रॉड्रिगीस यांना वेळ्ळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी माजी आमदार रॉड्रिगीस यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांची उपस्थिती होती. मतदार राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देतील, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.