वृद्धाच्या खून प्रकरणी संशयितास पोलीस कोठडी

0
12

ओर्डा-कांदोळी येथील एरनॉल्ड सुवारिस (60) यांचा खून करून कर्नाटकात पलायन केलेल्या संशयित अरविंदराज पवार (20) याला कळंगुट पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या सहाय्याने अटक करून मंगळवारी रात्री गोव्यात आणले. काल सकाळी त्याला म्हापसा न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. काल संशयिताचे वकील हजर नसल्याने गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात नेऊन अधिक कोठडी घेऊन पुढील चौकशी केली जाणार आहे.