विषारी दारू प्यायल्याने पंजाबात 23 जणांचा मृत्यू

0
9

विषारी दारू प्यायल्याने 23 जणांचा मृत्यू झाल्याची घटना पंजाबमधील संगरुरमध्ये घडली. यात काही जणांवर उपचार सुरू असून याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेच्या संदर्भात अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.