– वल्लभ केळकर
स्वामी विवेकानंद सार्थशती समारोह समिती व प्रेरणा ट्रस्ट, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या शनिवारी पणजी येथे ‘विवेकानंद व शिक्षण’ या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादात गोवा विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. सतीश शेट्ये, प्रकाश पाठक व जयंतराव सहस्रबुद्धे या तीन प्रज्ञावंतांनी आपल्या अमोघ वक्तृत्वशैलीने उपस्थितांची मने जिंकली. तिन्ही वक्त्यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू होता– मूल्य व वैज्ञानिक आधारावरची शिक्षणपद्धती व त्यांच्या अभावामुळे होत असलेला शैक्षणिक र्हास.
‘विवेकानंद व शिक्षण’ या विषयाची सुरुवात करताना श्री. पाठक म्हणाले, ‘‘शिक्षण नावाच्या विषयामधून मूल्य नावाचा विषय आम्ही बाजूला काढू शकत नाही. कारण शिक्षणामध्ये मूल्य हे इनबिल्ट असले पाहिजे, त्यामुळे इनबिल्ट असलेली गोष्ट टाळून अपेक्षित परिणाम मिळू शकत नाही. साक्षरता हीच शिक्षणाची फलश्रुती नाही. शिक्षण हे सरकारचे नैतिक व कायदेशीर काम आहे. शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे.’’ न्यायालयाच्या एका जजमेंटचा हवाला देताना पाठक म्हणाले, यययणपर्षेीींीपरींशश्रू, थश रीश पेीं ळप िेीळींळेप ींे ळपर्लीश्रलरींश ींहश र्ींरर्श्रीश ीूीींशा ळप र्ेीी शर्वीलरींळेप.’ डे शर्वीलरींळेप ळी पेीं रलश्रश ींे सर्ळींश रििीेिीळरींश वळीशलींळेप ींे र्लेीपींीू.
ज्या प्रकारच्या शिक्षणपद्धतीला आपण स्वीकाराल त्यातून साक्षरतेचे प्रमाण घटणे, गरिबी कमी होणे या खूप छोट्या गोष्टी आहेत. कारण परिस्थितीतला बदल आणि वृत्तीतला बदल हे शिक्षणाला अभिप्रेत आहे.
सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. शिक्षणामुळे स्वभाव, वृत्ती, देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, लोककल्याण या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये उतरल्या पाहिजेत. स्वातंत्र्यापूर्वी शिक्षणाची एवढी द्वारे खुली नव्हती. आजच्या तुलनेत शिक्षण कमी होते, परंतु मूल्यांना जपत जगणारा समाज अस्तित्वात होता. त्या स्थितीचा उल्लेख लॉर्ड मॅकोलेने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बोलताना केला होता–
ख हर्रींश ींीर्रींशश्रश्रशव रललीेीी ींहश श्रशपसींह रपव लीशरवींह ेष खपवळर रपव ख हर्रींश पेीं ीशशप ेपश शिीीेप ुहे ळी र लशससरी, ुहे ळी र ींहळशष.
र्ीीलह ुशरश्रींह ख हर्रींश ीशशप ळप ींहळी र्लेीपींीू र्ीीलह र हळसह ोीरश्र र्ींरर्श्रीशी, शिेश्रिश ेष र्ीीलह लरश्रळलीश, ींहरीं ख वे पेीं ींहळपज्ञ ुश र्ुेीश्रव र्शींशी लेर्पिींशी ींहळी र्लेीपींीू; र्ीपश्रशीी ुश लीशरज्ञ ींहश र्ींशीू लरलज्ञलेपश ेष ींहळी परींळेप. ुहळलह ळी हशी ीळिीर्ळींीरश्र रपव र्लीर्श्रींीीरश्र हशीळींरसश.
अपव ींहशीशषेीश, ख िीेिेीश ींहरीं ुश ीशश्रिरलश हशी ेश्रव रपव रपलळशपीं शर्वीलरींळेप ीूीींशा, हशी र्लीर्श्रींीीश.
या देशातील शिक्षण व संस्कृती या देशाचा कणा आहे. तो मोडल्याशिवाय आम्ही या देशावर वर्चस्व गाजवू शकत नाही.
स्वामी विवेकानंद म्हणत की, शिक्षणाला दोन पदर असतात. आंतरिक व बाह्य. माणसांचं घडणं हे आंतरिक मनाशी जोडलेलं असत. शिक्षण नावाच्या प्रक्रियेत माणूस घडविण्याच्या प्रक्रियेला महत्त्व असतं. त्या प्रक्रियेत नैतिक मूल्ये ही इनबिल्ट करावी लागतात. प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर एकदा त्यांच्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ‘वैज्ञानिक बनणे कठीण आहे, परंतु माझं विज्ञानाचं ज्ञान समाजाच्या उत्थानासाठी वापरण्याची मानसिकता निर्माण होणे ही कठीण, त्याहूनही कठीण गोष्ट असते.’
आज आपल्या देशात क्रायसिस ऑफ कॅरेक्टर ही मोठी समस्या आहे, व हा विषय फिजिओलॉजिकल व स्पिरिच्युअल बाबींशी निगडीत आहे. शिक्षण म्हणजे माहिती देणे. हा एक भाग आहे; गाभा नव्हे. माणसाची उंची समाज नावाच्या विषयापर्यंत जात नाही तोपर्यंत त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. विद्यार्थ्यांना विशालतेचे, उन्नततेचे, विलोभनीय दीपस्तंभाचे दर्शन घडविण्याची आवश्यकता असते. या हृदयीचे त्या हृदयी करते ते शिक्षण व हे जो करतो तो शिक्षक.
प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला म्हणाले होते, ‘शिक्षणाचा उद्देश अपलिफ्टमेंट ऑफ एन्टायर सोसायटी असला पाहिजे.’
हा माझा विद्यार्थी म्हणण्यापेक्षा हे माझे शिक्षक होते हे म्हणण्याचे भाग्य प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यात आले पाहिजे. शिक्षण हे वर्गापुरते मर्यादित नाही. उत्तम शरीरामध्ये उत्तम बुद्धी वास करते. मेंदू व मनाच्या जोडीला मनगट नावाचा विषय शिकविला गेला पाहिजे. मनगट हे भक्तीयुक्त शक्तीचे प्रतीक असून मितीयुक्त शक्तीचे नाही. मनगट म्हणजे अधिकार आहे, सत्ता नव्हे. म्हणूनच स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे म्हणणार्या टिळकांचा अधिकार कर्झनपेक्षा जास्त आहे.
शक्तीला भक्तीचा स्पर्श नसेल तर मनगटाच्या जोरावर दुर्योधन, रावण होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच हनुमंताला शक्तीयुक्त असून मी दास आहे असे म्हणावे लागले.
बुद्धी समतोल वागायला शिकविते, कमिटेड वागायला शिकवीत नाही; व नॉन कमिटेड समाज काहीच करू शकत नाही. कसं वागावं हे शिकविताना तू शक्तिमान झाला पाहिजेस, नीतिवान झाला पाहिजेस, पण भीतीयुक्त अंतःकरणाने वागला पाहिजेस हे शिकविले पाहिजे. त्यासाठी योग्य संस्काराची आवश्यकता असते. चंदनाचे झाड कष्टपूर्वक निर्माण करावे लागते, बाभळीसाठी प्रयत्न करण्याची गरज नसते.’’
याबाबत काही विद्वानांची व्याख्या करताना पाठक म्हणाले, ‘‘ज्यांना आपल्या युक्तीने आपली बुद्धी सत्ता नावाच्या उंबरठ्यावर छान घासता येते त्यांना विद्वान म्हणतात. अशा प्रकारच्या विद्वानांमुळे शिक्षणाची फरफट होते. विद्यार्थ्यांना कमिटमेंट शिकविण्याची आवश्यकता असते. मोटिव्हेशन नावाचा विषय मनाशी आणि मनगटाशी जोडला की कमिटमेंट तयार होते. कारण बोनस दिल्यानंतर काम करणारे हे दाईसारखे असतात, आईसारखे नाही. विवेकानंद म्हणत, अधिकार नावाच्या विषयाला कमिटमेंट नावाचा विषय जोडला नाही तर देश संपेल. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या उक्तीप्रमाणे जगा, जगू द्या, दुसर्यांना जगायला शिकवा. विवेकानंदांनी समाजाचे वर्णन करताना म्हटले होते, ‘समाज हा माझ्या बालपणाचा पाळणा आहे, तारुण्याची फुलबाग आहे व हीच माझ्या वार्धक्याची वाराणशी आहे.’ ते म्हणत, नॉलेजला कॅरॅक्टर, सायन्सला ह्युमॅनिटी, कॉमर्सला मोरॅलिटी, वर्कशीपला डिव्होशन, वेल्थला वर्क, पॉलिटिक्सला प्रिन्सिपल व प्लॅजरला कॉन्शियसनेस जोडले पाहिजे. शिक्षणातून समाजाच्या पहिल्या घटकापासून ते शेवटच्या घटकापर्यंतचा विकास झाला पाहिजे. शिकण्याची व शिकविण्याच्या अखंड प्रक्रियेचा प्रवास ज्यावेळेला मनात असतो त्याला विद्यार्थी म्हणतात.
शिक्षणाच्या बाबतीत आपल्या देशाला गौरवशाली परंपरा आहे. दुर्दैवाने आम्ही आपले स्वत्व विसरून दुसर्यांच्या मागे लागलो आहोत. कस्तुरी आपल्याकडे असताना सुगंधाचा शोध वेड्यासारखा घेण्याचे कारण नाही. मनगटाला सामर्थ्य देऊन आपलाच शोध घेण्याची गरज आहे.’’
जयंतराव सहस्रबुद्धे यांनी स्वामी विवेकानंदांचा ‘वैज्ञानिक द्रष्टा’ असा वेगळाच पैलू उलगडून दाखविला. ‘‘विवेकानंदांनी भारतीय विचारदर्शन समजवण्यासाठी आधुनिक विज्ञानाचा खूप मोठा वापर केला. विलक्षण बुद्धिमत्तेने विज्ञान क्षेत्रात दिशादर्शन केले. त्यांनी अनेक मूलभूत सैद्धांतिक भूमिका मांडल्या, त्या आज विज्ञानाने सिद्ध करून दाखविल्या. विज्ञान–तंत्रज्ञान यामधील स्वावलंबनच भारताला प्रगतिपथावर नेईल असा विश्वास स्वामीजींना होता,’’ असे मत जयंतराव सहस्रबुद्धे यांनी मांडले.
वेदान्ताचा आधार घेऊन कितीतरी वैज्ञानिक संकल्पनांची उकल स्वामींनी केली होती. भारतातील पहिली वैज्ञानिक संशोधन संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापनाही स्वामीजींच्या प्रेरणेतून झाली. आधुनिक भारतातील संन्याशांनी समाजाला धर्मासोबत विज्ञानाचेही शिक्षण दिले पाहिजे. आपल्या झोळीत संन्याशाने जगाचा नकाशा व कॅमेरा हाताळला पाहिजे असे विवेकानंद म्हणायचे. शिक्षणाच्या महत्त्वाविषयी प्रगल्भता स्वामीजींच्या विचारातून नेहमी प्रकट व्हायची. आजही त्यांनी दाखविलेला मार्ग अवलंबण्याची गरज असल्याचा सूर परिसंवादात व्यक्त झाला.