27.2 C
Panjim
Monday, April 19, 2021

विरुद्ध अन्न संकल्पना भाग – १

  • वैद्य स्वाती अणवेकर
    (म्हापसा)

आयुर्वेदात आहारामध्ये कुठले चवीचे पदार्थ कधी खावे हे सांगितले आहे. त्यात असे सांगितले आहे की जेवणाची सुरुवात गोड पदार्थाने करावी. पण आपण हल्ली पाहतो की गोड पदार्थ हा आपण ‘स्वीट-डिश’ म्हणून जेवण झाल्यावर खातो. हे क्रम-विरुद्ध आहे.

‘आहार नियोजन’ ह्या संकल्पनेतील एक महत्वाचा भाग आपण आज पाहणार आहोत. आयुर्वेदामध्ये ह्याला ‘विरुद्ध अन्न’ संकल्पना असे म्हंटले आहे आणि जवळ जवळ ५००० वर्षांपूर्वी आयुर्वेदामधील ग्रंथांमध्ये ह्याचा उल्लेख केलेला होता आणि आजही आहे.
तर आधी हे ‘विरुद्ध अन्न’ म्हणजे नेमके काय ते आपण समजून घेऊया. आयुर्वेदामध्ये असे काही अन्नपदार्थांचे संमिश्रण सांगितले आहे जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीत आणि ते वारंवार खाल्ल्याने आपल्याला नक्कीच त्रास होऊ शकतो.

काय गंमत आहे बघा. त्या कालच्या ग्रंथकर्त्याना हे आधीच समजले होते. कदाचित पुढे काही वर्षांनी असे चुकीचे एकापेक्षा जास्त अन्नपदार्थ एकत्रितपणे सर्रास लोक खाणार आहेत. म्हणून ते खाल्ल्याने काय होते हे त्यांनी आयुर्वेदामध्ये आधीच सांगून ठेवले आहे. आधुनिक आहारशास्त्र आणि आयुर्वेद ह्यामध्ये हाच मोठा फरक आहे की आधुनिक आहारशास्त्रानुसार सगळे खाद्यपदार्थ हे त्यामधील आहारीय मूल्य व घटक पाहून आरोग्यासाठी चांगले किंवा वाईट ठरवले जातात. पण आयुर्वेद त्यातील नुसते घटक पाहात नाही तर त्याचे योग्य वा अयोग्य संयोगालापण खूप महत्व देतं.

आयुर्वेदामध्ये १६ प्रकारचे विरुद्ध आहार सांगितले आहेत ते आपण पाहणार आहोत –
१) देश-विरुद्ध आहार –
इटलीमध्ये खाल्ला जाणारा पिझ्झा तिथल्या थंड वातावरणात योग्य वाटत असला तरी तोच पिझ्झा जर आपण इथे सतत खाऊ लागलो तर मात्र आपल्याला त्रास होणार. कारण तिथले वातावरण वेगळे आहे आणि आपले वातावरण वेगळे आहे.
उष्ण प्रदेशात अर्थात देशात जर आपण मसालेदार, कोरडे पदार्थ खाल्ले तसेच काश्मीरसारख्या थंड प्रदेशांत जर हलके आणि थंड पदार्थ खाल्ले तर ते जिभेला चालेल पण शरीराला चालणार नाही.

२) काल-विरुद्ध आहार –
दही किवा ताक हे रात्री पिऊ नये असे आयुर्वेद सांगते. पण ते जर आपण रात्री खाल्ले तर ते काल-विरुध्द झाले. तसेच हिवाळ्यात थंड पदार्थ खाणे किंवा उन्हाळ्यात उष्ण पदार्थ खाणे हा कालविरुद्ध आहार होय.

३) अग्नी-विरुद्ध आहार –
ज्या व्यक्तीला खूप भूक लागते अर्थात ज्याची पचनशक्ती चांगली आहे त्याने कमी जेवणे आणि ज्याची भूक कमी आहे तसेच पचन मंद आहे त्याने जास्त जेवणे हे अग्नी-विरुद्ध आहे.

४) मात्रा-विरुद्ध आहार –
तूप आणि मध हे सम प्रमाणत खाऊ नये असे म्हणतात पण तेच जर तसे खाल्ले तर ते मात्रा-विरुद्ध होणार.

५) सात्म्य-विरुद्ध आहार –
सात्म्य अर्थात पचणे. आपण जेव्हा आहार घेतो तेव्हा त्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला पचतात असे नाही. काही जणांना दूध पचत नाही तर काहीना गहू पचत नाही. काही असे असतात त्यांना तिखट चालत नाही तर काहीना थंड चालत नाही. पण जर असे न पचणारे पदार्थ ते वारंवार खात असतील तर तो सात्म्य-विरुद्ध आहार झाला.

६) संस्कार-विरुद्ध आहार – संस्कार अर्थात अन्नप्रक्रिया –
काही अन्नपदार्थ असे असतात ज्यावर काही जेवण बनवताना केल्या जाणार्‍या प्रक्रिया चालत नाहीत- जसे मध हे गरम करून खाणे चांगले नाही. तसेच आयुर्वेद सांगते की भाज्या कच्च्या खाऊ नये. तरी बरेच लोक असे असतात जे कच्च्या भाज्यांचे सलाद भरपूर घेतात.

७) वीर्य-विरुद्ध आहार –
अर्थात त्या आहाराचा शरीरावर होणारा परिणाम. ह्याचे उदाहरण द्यायचे झाले तर गरम चहा पिऊन जर तुम्ही थंड आईसक्रीम खाल्ले तर किंवा कडक उन्हातून येऊन थंडगार पाणी प्यायले तर.

८) कोष्ठ-विरुद्ध आहार –
काही जणांचे कोष्ठ अर्थात कोठा हा जड असतो म्हणून ह्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त असतो तर काही जणांचा कोठा हा मृदू असतो म्हणून ह्यांना पातळ शौचाला होण्याची जास्त सवय असते. ज्यांचा कोठा जड आहे त्यांनी जर कोरडे हलके रुक्ष पदार्थ जास्त खाल्ले जसे बिस्कीट, पाव इ. आणि मृदू कोठा असणार्‍याने जड, स्निग्ध पदार्थ अधिक खाल्ले- जसे दुध, तूप तर ते कोष्ठविरुद्ध होते.

९) अवस्था-विरुद्ध आहार –
ह्यात वय असेल किंवा शरिराची अवस्था. जर एखादी व्यक्ती आहे जिला एरवी थंड पदार्थ चालतात पण आता तिला सर्दी झाली आहे आणि तरी ती थंड पदार्थ खाते आहे तर ते अवस्था-विरुद्ध आहे. त्याचप्रमाणे वृद्ध अवस्थेमध्ये जर एखादी व्यक्ती जड अन्न खात असेल तर तेदेखील अवस्था-विरुद्ध आहे कारण ह्या वयात तिला असे जड अन्न पचवणे कठीण जाणार.

१०) क्रम-विरुद्ध आहार –
आयुर्वेदात आहारामध्ये कुठले चवीचे पदार्थ कधी खावे हे सांगितले आहे. त्यात असे सांगितले आहे की जेवणाची सुरुवात गोड पदार्थाने करावी पण आपण हल्ली पाहतो की गोड पदार्थ हा आपण ‘स्वीट-डिश’ म्हणून जेवण झाल्यावर खातो. हे क्रम- विरुद्ध आहे.

११) परिहार-विरुद्ध आहार –
अर्थात ज्या गोष्टी करू नये त्या करणे म्हणजे ज्या गोष्टी टाळल्या पाहिजे त्याच आहार घेताना करणे. अर्थात जेवणात तुम्ही मासे खाल्ले आणि जेवण झाल्यावर दूध किवा ताक प्यायलात तर ते परिहार-विरुद्ध झाले.

१२) पाक-विरुद्ध आहार –
चुकीच्या पद्धतीने बनवलेला आहार घेणे अर्थात जेवणात कच्चे करपलेले किंवा खूप तेलकट पदार्थ घेणे. उदाहरणार्थ जर तुम्ही बटाटा अर्थात तेलात तळून खाल्ला तर तो पाक-विरुद्ध झाला. जर कुणाला जापनीज पदार्थ आवडत असेल तर तेही पाक-विरुद्ध आहे कारण त्यात शिजवलेल्या भातासोबत कच्चे मासे खाल्ले जातात.

१३) संयोग-विरुद्ध आहार –
ह्यात दोन अशा गोष्टी एकत्र करून खाणे ज्या वेगवेगळ्या खाल्ल्या तर पौष्टिक असतात पण एकत्र खाल्ल्या तर मात्र आरोग्याला हानिकारक ठरतात- जसे दुध आणि फळे ही वेगवेगळी पोषक आहेत पण ती एकत्र करून केलेला मिल्कशेक हा मात्र आरोग्याला अपायकारक म्हणून तो संयोग-विरुद्ध आहे.

१४) हृद -विरुद्ध आहार –
आपल्या आहारामधील अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडत नाहीत आणि त्या जर आपण बळजबरीने खाल्ल्या तर ते हृद-विरुद्ध होते. जसे एखादी व्यक्ती जिने नॉनव्हेज कधीच खाल्ले नाही त्याने जर ते खायचा प्रयत्न केला तर त्याला कदाचित ते आवडणार नाही.

१५) संपाद-विरुद्ध आहार –
अर्थात जे अन्न खाऊ नये ते खाणे म्हणजे शिळे, नासके अन्न खाणे. उदाहरण आपण हल्ली जे बंद पॅकेटमधील आणि फ्रोझेन पदार्थ खातो ते संपाद-विरुद्ध अन्न होय.

१६) विधी-विरुद्ध आहार –
आयुर्वेदामध्ये जेवणाचे काही नियम सांगितले आहेत- त्यात खाली बसून जेवावे हे सांगितले आहे पण आपण जेव्हा एखाद्या पार्टी किवा लग्नात जातो तर तिथे बुफे मांडतात आणि अशा गर्दीमध्ये मग आपण उभ्याने जेवतो… ह्याला म्हणतात विधी-विरुद्ध आहार.
तर आजच्या लेखामध्ये आपण १६ प्रकारचे आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेले विरुद्ध आहार कोणते ते सविस्तर पाहिले.
पुढच्या आठवड्यात आपण आयुर्वेद तसेच रोजच्या आपल्या जीवनामध्ये कोणकोणते विरुद्ध आहार घेतो ते पाहूया.

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

कोरोना लसीकरण घ्यावे का?

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज) या एका वर्षात संशोधकांनी कठोर मेहनतीने कोरोनावर लस बनवली; मात्र आज कोरोना लसीकरण जगभरात...

थर्टीन

लेख- १३ बायोस्कोप प्रा. रमेश सप्रे ‘थर्टीन’ शब्दाचेही दोन पैलू आहेत. शुभ नि अशुभ! आपण अशुभ...

अनासक्तीचा आदर्श ः ‘कमळ’

योगसाधना - ५००अंतरंग योग - ८५ डॉ. सीताकांत घाणेकर शास्त्रीजी कमळाबद्दल सारांश करताना म्हणतात- कमळ...

क्षयरोग्यांनाही लसीकरण उपयुक्त

डॉ. प्रदीप महाजन (रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर) या लसींमध्ये सक्रिय व्हायरस नसतो ज्यामुळे एखाद्याला रोगाचा त्रास होईल किंवा आरोग्य...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) सूर्याच्या प्रखर उष्णतेने शरीराचा ओलावा कमी होतो, घामावाटे, मूत्रावाटे व काही प्रमाणात मलावाटे शरीरातून...