विनयभंग प्रकरणात 2 शिक्षकांना जामीन

0
4

येथील बाल न्यायालयाने शालेय मुलीच्या विनयभंग प्रकरणात फोंडा तालुक्यातील एका विद्यालयाच्या दोन शिक्षकांना काल अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षकाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या 11 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. फोंडा तालुक्यातील एका सरकारी अनुदानित विद्यालयातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी म्हार्दोळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली
आहे.

या प्रकरणात पीडित मुलीने संशयित शिक्षकाविरोधात अन्य दोघा शिक्षकांकडे पहिल्यांदा तक्रार नोंदवली होती; मात्र त्यांनी कारवाईत कुचराई केली होती. त्यामुळे या दोन शिक्षकांविरोधात तक्रार दाखल झाल्याने त्यांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.