विनयभंग करणार्‍या शिक्षकावर कारवाई नाही : नाराजी

0
133

कांदोळी येथील एका विद्यालयातील एका शिक्षकाने एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याची घटना घडल्यानंतरही सदर शिक्षकावर कोणतीही कारवाई न केल्याने विद्यालयाच्या प्राचार्याने आपल्या पदाचा गैरवापर केलेला असून या विनयभंग प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी करणारे एक निवेदन ‘ह्युमन राईट्‌स डिफेन्डर्स’ या बिगर सरकारी संघटनेने एका निवेदनाद्वारे गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विद्या शेट तानावडेकर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी माहिती हक्क कायद्याखाली संघटनेने माहिती मागितली असता ती माहिती देण्यास पीडित मुलीने हरकत घेतल्याचा मुद्दा उपस्थित करून माहिती नाकारल्याचा आरोपही संघटनेचे अध्यक्ष ऍडव्हिनो फर्नांडिस यांनी काल पत्रकारांशी बोलताना केला. विनयभंगाची घटना २०१३ साली घडली होती व पीडीत मुलीने त्यासंबंधी विद्यालयाकडे लेखी तक्रारही केली होती. मात्र, विद्यालय व्यवस्थापनाने तक्रार देऊनही कोणतीही कारवाई केली नाही. त्याचा परिणाम असा झाला की नंतर आणखी सहा-सात मुलींचाही सदर शिक्षकाने विनयभंग केला. पण घाबरून एकाही मुलीने तक्रार केली नाही. लैंगीक शोषण झाल्यास तक्रार करण्यासाठी सदर विद्यालयात विशाखा समितीही नसल्याचे फर्नांडिस म्हणाले.