विधानसभा घेराव दरम्यान एबीव्हीपी-पोलिसांत संघर्ष

0
11

झारखंड विधानसभेला घेराव घालण्याच्या आंदोलनादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात काल संघर्ष झाला. हे कार्यकर्ते जुन्या विधानसभा इमारतीजवळ जमले होते आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस तिथे पोहोचले. काही कार्यकर्ते रस्त्यावर झोपले, तर काहीजण पोलीस व्हॅनसमोर बसले. पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असता झटापट आणि संघर्ष झाला. यावेळी एबीव्हीपच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

दुसरीकडे, भाजपने मंगळवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. रांचीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते रोखले. काही जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ते दुकाने बळजबरीने बंद करताना दिसले. परिणामी पोलिसांनी अनेक शहरांमध्ये काही व्यक्तींना ताब्यात घेतले.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विरोधकांवर तरुणांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. विरोधक गोंधळ घालत राहतील, पण आम्ही आमचे काम सुरूच ठेवू. सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे, असे सोरेन म्हणाले.