विधानसभा अधिवेशन काळात जमावबंदीचा आदेश

0
5

उत्तर गोवा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांनी राज्य विधानसभा अधिवेशन सत्र काळात पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाच्या सभोवतालच्या 500 मीटर भागात आणि पणजी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गल्लीत, रस्त्यात, चौकात किंवा कोणत्याही खुल्या जागेत व्यक्ती किंवा व्यक्तींचा समुह जमा होण्यास आणि मिरवणूक काढण्यास किंवा आयोजित करण्यास बंदी लागू केली आहे. तसेच कोणतीही मिरवणूक, मोर्चा, रॅली, धरणे यांनाही बंदी लागू करण्यात आली आहे.