विजेच्या धक्क्याने कारापुरात महिलेचा मृत्यू

0
17

कारापूर येथील एका 50 वर्षीय महिलेचा घरात विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडली. वासंती रामा सालेलकर असे मृत महिलेचे नाव आहे. डिचोली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला घरात असताना एका लोखंडी बंद दाराच्या फटीतून वीजवाहिनी गेली होती. सदर वीजवाहिनी विद्युतभारित होती. सदर महिलेने बटण सुरू केल्यानंतर वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने तिचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.