लोहिया मैदानावर नेत्रावळी बाजाराचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आमदार सुभाष फळदेसाई, कायदा अयोगाचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, शेतकरीवर्ग उपस्थित होते. या बाजारात माटोळीसाठी लागणारे सामान, गोड पदार्थ आदी दुकाने थाटलेली असून ते दोन दिवस खुले राहणार आहे. आमदार सुभाष फळदेसाई व कृषी खात्याच्या सहकार्याने बाजार भरविण्यात आला.
फातोर्डा मतदारसंघाचे प्रश्न सोडविणार
फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांच्या मागणीवरून फातोर्डा मतदारसंघातील रस्ते व इतर विकास कामासंबंधी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सरदेसाई यांच्याशी चर्चा केली. फातोर्डा येथील लिंगाजवळ वाहतुकीची कोंडी होती ती सोडविण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करणे, गटारांची सुधारणा आदी समस्या त्यानी प्रत्यक्ष दाखविल्या. हे सर्व प्रश्न लवकरच सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.