‘विकसित भारत’च्या धर्तीवर आता ‘विकसित गोवा 2047′

0
11

‘विकसित भारत 2047′ संकल्पनेच्या धर्तीवर ‘विकसित गोवा 2047′ चा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया गोवा सरकारने सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विकसित भारत 2047 हे अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर गोवा सरकारने सुध्दा विकसित गोवा 2047 चा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली येथील गोवा सदनमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोस्तान कन्सल्टिंग ग्रुप इंडियातर्फे तयार करण्यात येत असलेल्या विकसित गोवा 2047 दस्तऐवजाच्या प्रगतीचा आढावा एका बैठकीत काल घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विकसित गोवा 2047 दस्तऐवजासाठी मौलिक सूचना दिल्या. या आढावा बैठकीला नवी दिल्लीतील गोवा सदनचे निवासी आयुक्त संजीव आहुजा, नीती आयोगाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अण्णा रॉय, गोवा सरकारच्या नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालयाचे संचालक विजय सक्सेना, बीसीजीचे आशिष गर्ग, सिद्धार्थ मदान, अंकुश वढेरा, पुलकिता शर्मा आणि ऋषभ शाह यांची उपस्थिती होती.