राज्यात गत एप्रिल महिन्यात वाहन अपघातांमध्ये 26 जणांचा बळी गेला आहे. या महिन्यात एकूण 198 वाहन अपघाताची नोंद झाली असून, त्यात 24 प्राणघातक अपघातांचा समावेश आहे. वाहतूक संचालनालयाने एप्रिल महिन्यातील वाहन अपघातासंबंधी आकडेवारी जाहीर केली आहे.
वाहन अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 17 वाहनचालक, 4 दुचाकीवरील प्रवासी आणि 5 पादचारी यांचा समावेश आहे. या महिन्यात एकूण 198 रस्ते अपघात झाले, त्यापैकी 24 प्राणघातक अपघात आहेत. उत्तर गोव्यात 12 आणि दक्षिण गोवा 12 प्राणघातक अपघातांची नोंद झाली आहे. तसेच 15 गंभीर अपघात (उत्तर गोवा – 7 आणि दक्षिण गोवा – 8), 43 किरकोळ अपघात (उत्तर गोवा – 13 आणि दक्षिण गोवा – 30) आणि 116 अपघातांत कुणालाही दुखापत झालेली नाही उत्तर गोव्यात रस्ता अपघातात 12 आणि दक्षिण गोव्यात रस्ता अपघातात 14 जणांचा बळी गेला. वाहन अपघातात 17 लोक गंभीर जखमी झाले असून, त्यात उत्तर गोव्यात 8 आणि दक्षिण गोव्यात 9 जणांचा समावेश आहे. 76 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.