वाहनांनी ठोकरल्याने फोंड्यात दोन ठार

0
156

खाजोर्डा-बोरी व ढवळीमळ येथे ‘रस्त्यावरून चालत जाणार्‍या पादचार्‍यांना वाहनांनी ठोकल्याने दोघांचा मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची घटना घडली.
काल सकाळी खाजोर्डा बोरी येथे श्री नवदुर्गा देवीच्या रथोत्सवाला जाऊन ओटी भरण्यासाठी तीन विवाहीत बहिणी रस्त्याच्या कडेने जात होत्या. जीए ०८ व्ही १६५७ नंबरच्या दुध घेऊन आलेल्या टेम्पोने त्यांना जोरात धडक दिली असता दक्षता देवीदास जल्मी (३६) गोवठण ही जागीच ठार झाला. दुसरी दीक्षा दत्ता आमोणकर (बेती-वेरे) ही बहिण जखमी झाली तर तिसरी बहिण गीता घनश्याम नाईक (खाजोर्डा) ही किरकोळ जखमी झाली. जखमी गीताला तातडीने बांबोळी येथे गोमेकॉत दाखल केले आहे. विवाहीत मुलींनी रामनवमीला उपस्थित राहून श्रींची ओटी भरावी अशी प्रथा आहे. नवस फेडण्यापूर्वीच दीक्षा अपघातात मरण पावली.
फोंडा पोलिसांनी पंचनामा करून टेम्पो चालक कामता प्रसाद (२६) मूळ राहणार उत्तर प्रदेश सध्या वास्तव्य कपिलेश्‍वरी याला अटक केली आहे. पुढील चौकशी फोंडा पोलिस करत आहेत.
दरम्यान, दुसर्‍या एका अपघातात ढवळीमळ येथे ५० वर्षे वयाच्या व्यक्तीला रस्त्याने चालत जात असताना जी. ए. ०५ बी. २०८८ नंबरच्या ट्रकने धडक दिली असता तो मरण पावला. मयताचे नाव समजले नाही. ट्रक व चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.