वाहतुकीसाठी झुआरी, बोरी पूल धोकादायक : सुदिन ढवळीकर

0
13

झुआरी व बोरी हे दोन्ही जुने पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरले असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर नवा झुआरी पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करायला हवा, तसेच बोरी येथे नवा पूल उभारणीचे कामही लवकरात लवकर सुरू व्हायला हवे, असे ढवळीकर म्हणाले.

हे दोन्ही पूल हे जुने असल्याने अर्थांतच ते बांधण्यासाठी वापरण्यात आलेले ‘कॅन्टीलिव्हर’ हे तंत्रज्ञानही आता कालबाह्य ठरले असल्याचे ढवळीकर म्हणाले. जगभरात कुठेही आता त्या तंत्रज्ञानाचा वापर करून पूल बांधण्यात येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

‘कॅन्टीलिव्हर’ तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेला मांडवी नदीवरील पूल हा बर्‍याच वर्षांपूर्वी कोसळलेला असून, आता या तंत्रज्ञानाने बांधलेले केवळ दोनच पूल राज्यात उभे असून, त्यात बोरी व झुआरीवरील पुलाचा समावेश आहे, असेही ढवळीकर म्हणाले.