वेलंकणीला जाणार्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण पश्चिम रेल्वे वास्को-वेलांकणी मार्गावर खास रेल्वेगाडी सुरू करणार आहे.
ही रेल्वे दि. २९ ऑगस्ट, २ व ५ सप्टेंबर रोजी वास्कोहून वेलांकणीकडे निघेल. ती वास्को स्थानकावरून सकाळी ९ वा. सुटेल व वेलांकणीला दुसर्या दिवशी दुपारी १२.२५ वा. पोचेल.
येणारी गाडी वेलांकणी स्थानकावरून ३० ऑगस्ट, ३ व ९ सप्टेंबर रोजी निघेल. ती तेथून दुपारी २.२५ वा. सुटेल व वास्कोला दुसर्या दिवशी ७.५० वा. पोचेल. १८ डब्यांची ही रेल्वे आहे.