Home बातम्या वास्कोत स्कूटर अपघातात विद्यार्थी ठार

वास्कोत स्कूटर अपघातात विद्यार्थी ठार

0

येथील सेंट अँड्र्यू चर्च परिसरातील जंक्शन जवळ टिपर ट्रकला दुचाकीचा पाठीमागून धक्का बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला संकीत अवलोर (९) हा बागलकोट येथील विद्यार्थी ठार झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत संकीत हा बागलकोट येथे इयत्ता ४ थीच्या वर्गात शिकत होता.

गेल्या १५ दिवसांपूर्वीच तो शांतीनगर येथे राहणार्‍या आपल्या मामाकडे आला होता. दुपारी संकीत हा आपला मामा रामचंद्र लमाणी याच्या दुचाकी वरून (क्र. जीए ०६ एच ९७९४) गोवा शिपयार्डकडून शांतीनगर येथे जात होता. मडगावहून बॉक्साईट घेऊन मुरगाव बंदराकडे जाणारा टिपर ट्रक जंक्शन जवळ अचानक थांबल्याने पाठीमागून येणार्‍या दुचाकीची धडक बसून ते दोघेही खाली पडले. यावेळी संकेत याच्या डोक्याला मार लागल्याने लगेच त्याला बायणा येथील खासगी इस्पितळात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.