सायमोळे-बायणा येथील अशोक सुर्लीकर (५६) यांनी घरात कोणीच नसल्याची संधी साधून गळफास लावून आत्महत्या केली. अशोक सुर्लीकरांची पत्नी गोव्याबाहेर गेली होती. रविवारी रात्री ती घरी आली असता पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. याप्रकरणी वास्को पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. सुर्लीकर यांचा मुलगा इराकमध्ये नोकरीला असतो तर मुलगी बंगळूरला असते. आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असे सुर्लीकर यांनी चिठठ्ीत लिहिले आहे.

