शाहिनाज कासीम शेख (२०) या विवाहित महिलेने काल सकाळी अकरा वाजता घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत हिचे कासीम रहाणार (विजापूर) यांच्याशी दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते व ती विजापूर येथे आपल्या पतीच्या घरी राहण्यास गेली होती.
परंतु कासीम व शहनाज दोन दिवसापूर्वी वास्को शहनाज आपल्या मांगुर येथील आईच्या घरी राहण्यास आली होती. काल घरात कुणीही नव्हते यावेळी साडीने गळफास लावून आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण समजले नसून वास्को पोलिस पुढील तपास करीत आहे.