वास्कोत कार्निव्हल मिरवणूक उत्साहात

0
95
वास्को येथील मिरवणुकीत सहभागी झालेला एक आकर्षक चित्ररथ. (छाया : सोनल तळणकर)

गोमंतकीय संस्कृती आणि पारंपरिक व्यवसाय दाखविण्यार्‍या, तसेच खा प्या मजा करा असा संदेश देत किंग मेमोच्या नेतृत्वाखाली वास्को शहरात कार्निव्हल मिरवणूक काढण्यात आली.यावेळी स्थानिकांसह देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वास्को शहरात दि. १४ पासून कार्निव्हल कार्यक्रमांना सुरूवात झाली होती. गेले दोन दिवस विविध कार्यक्रम सादर करण्यात आले होते. काल उत्तर व दक्षिण गोव्यातून वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या चित्ररथ मिरवणुकींचा वास्कोवासीयांनी मनमुराद आनंद लुटला. वास्को चर्चकडून वीजमंत्री मिलिंद नाईक, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, दाबोळीचे आमदार मावीन गुदिनो, वनमंत्री एलिना साल्ढाणा, मच्छीमार मंत्री आवेर्तान ङ्गुर्तादो, मुरगावच्या नगराध्यक्षा भावना भोसले, नगरसेविका ङ्गियेलो रेगो व इतर व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते. वास्को चर्चकडून निघालेली चित्ररथ मिरवणूक सरकारी हायस्कूल, दामोदर मंदिर, लोपाझ गार्डन हॉॅटेल, एच. क्यू. हॉटेलकडून जोशी चौकात आल्यानंतर मनोरंजन करण्यात आले व तेथून सरळ बँक ऑङ्ग इंडिया, वास्को मार्केटकडून आय.ओय.सी.कडे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
या चित्ररथ मिरवणुकीत पारंपरीक, क्लब संस्था, पुरस्कृत व्यापारी संस्थांचे ६५ चित्ररथ सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्ङ्गा रंगबिरंगी पताका उभारण्यात आल्या होत्या. तसेच विविध वेशांत नागरिकही उभे होते. मुलगी वाचवा, अमली पदार्थापासून दूर रहा, कृषी, मच्छीमारी, दुग्ध व्यवसाय, अतिरेक्यांवर पहारा ठेवणारे दृश्य,भारतीय नौदल असे वुवुध चित्ररथ सहभागी झाले होते.