वारखंड खून प्रकरणी भाऊ व भावजयीस रिमांड

0
63

वारखंड-वरचावाडा येथील सदानंद ठाकूर यांचा खून केल्याप्रकरणी अटक केलेला त्यांचा भाऊ एकनाथ ठाकूर व भावजय एकांती ठाकूर यांना न्यायालयाने आठ दिवस पोलीस कोठडी दिली. वरील दोघांना सदानंद यांचा दगडाने ठेचून व दंडुक्याने मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, सदानंद ठाकूर यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, जमिनीच्या वादातून हा खून घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.