नितीश कुमार यांनी मंगळवारी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करत वादग्रस्त टिप्पणी केली. यामुळे महिला आमदार खजिल झाल्या, तर पुरुष आमदारांमध्ये खसखस पिकली होती. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर काल नितीश कुमार यांनी माफी मागितली. माझ्या वक्तव्यावर प्रचंड टीका होत आहे. मी जर काही चुकीचे बोललो असेल, तर मी माफी मागतो. मी माझे वक्तव्य मागे घेतो, असे नितीश कुमार म्हणाले.