सध्या वेगवेगळ्या प्रश्नावर सरकारवर टीका केल्याने वादग्रस्त बनलेले सांतआंद्रेचे आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी काल संध्याकाळी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
अन्य मंत्री, आमदार यांनीही भाजप कार्यालयात जाऊन तेंडुलकर यांना शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांसमवेत प्रदेश भाजप अध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी येणारे वाघ हे एकमेव आमदार होते. आपल्या वाढदिनाच्या निमित्ताने तेंडुलकर यांनी काल रात्री येथील मांडवी हॉटेलमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.