वाघेरी डोंगर कापणी प्रकरण वनरक्षक विवेक गावकर निलंबित

0
43

वन खात्याने पश्‍चिम घाटातील जैवसंवेदनशील क्षेत्रातील वाघेरी डोंगर कापणी प्रकरणी वनरक्षक विवेक गावकर याला निलंबित केले आहे, अशी माहिती वनमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. तसेच राणे यांनी संबंधित उपवनपालाला निलंबित करण्याची शिफारस केली आहे. वनरक्षक अधिकार्‍याला सूचना देऊन सुध्दा वाघेरी डोंगरीवरील कापणी रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.