तळपणवाडा-शिरोडा येथे जन्मदात्या पित्याचा खून केल्याने या खून प्रकरणातील संशयित राजेश गावकर याला फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्यांनी सात दिवसांची पोलीस कोठडीची दिली आहे. ही घटना बुधवारी घडली होती. लग्नाच्या विषयावरून भांडण उकरून संशयित राजेश गावकर याने आपले वडील गणेश गावकर यांच्यावर लोखंडी पहार व टाईल्सचा तुकडा डोक्यावर मारल्याने यात गणेश गावकर गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते. फोंडा पोलिसांनी संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला होता.

