अखिल गोवा मुस्लीम जमात संघटनेने वक्फ कायदा दुरुस्ती विधेयकाला 2025 ला विरोध केला आहे. समाजाला धर्मा-धर्मात विभागण्याचा प्रकार निंदनीय आहे, असे संघटनेचे अध्यक्ष शेख बशीर अहमद यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. वक्फ कायदा दुरुस्ती भारतीय घटनेच्या विरोधात आहे. गोव्यात वक्फ कायदा दुरुस्तीच्या विषयावरून समाज बांधवांत खोटा प्रचार केला जात असून, या खोट्या प्रचाराला बांधवांनी बळी पडू नये. एएजीएमजे ही संघटना वक्फ विधेयक नाकारणाऱ्या देशातील बहुसंख्य मुस्लीम बांधवाच्या सोबत आहे, असेही शेख बशीर अहमद यांनी म्हटले आहे.